कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. यासाठी केंद्र सरकारकडून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीचा साठा उपलब्ध करून दिला जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली की राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे कोरोना लसीचे 17 कोटी डोस अजूनही उपलब्ध आहेत ज्याचा वापर केला जाऊ शकतो. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारत सरकारने आतापर्यंत लसीचे 193.53 कोटी (1,93,53,58,865) डोस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करून दिले आहेत. यापैकी 17 कोटी (17,00,16,685) डोस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही शिल्लक आहेत जे वापरता येतील.केंद्राने ही सुविधा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत दिली आहे.