राज्यात ८६८ कोरोनाग्रस्त

सोमवार, 6 एप्रिल 2020 (22:44 IST)
राज्यातील करोनाची लागण झालेल्यांची संख्या ८६८ वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात १२० रुग्णांची भर पडली आहे. 
 
७० करोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १७ हजार ५६३ नमुन्यांपैकी १५ हजार ८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर ८६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. 
 
दरम्यान, आज राज्यात ७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी ४ जण मुंबईतील, प्रत्येकी १ जण नवी मुंबई, ठाणे, वसई विरार येथील आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती