महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या 2334 इतकी झाली आहे. माहितीनुसार महाराष्ट्रात दिवसभरात 352 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने ही संख्या वाढली असून चिंता वाढली आहे. देशभरात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. करोनामुळे 11 जणांचा मृत्यूही झाला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.