बेबी मसाजचे फायदे माहित आहे का?

बुधवार, 8 मे 2019 (16:06 IST)
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा आहार, देखरेख व पोषक वातावरण आदी महत्वपूर्ण गोष्टींची काळजी घ्यावी लागते. मा‍त्र या व्यतिरिक्त बाळ तंदुरूस्त राहावे म्हणून बेबी मसाज लाभदायी असतो. मसाजमुळे मुलांची हाडे तंदरूस्त होतात. शिवाय मुलाच्या बुद्धिलाही चालना मिळत असते. लहान मुलाच्या मसाजचा भारतीय आयुर्वेदातही उल्लेख आढळतो. 
 
मसाजचे फायदे- 
* मसाजमुळे मुलाचे वजन वाढण्यास मदत होते. 
* दिवसभरातून किमान एक वेळा मसाज केल्याने मुलाचे स्नायू बळकट होतात. 
* मसाजमुळे मुलामधील एकाग्रता वाढते. 
* मुलाच्या पोट व पचनक्रियेसंबंधी व्याधी दूर होतात. 
* मसाजमुळे मुले व आई यांच्यात घनिष्टता वाढीस लागते. 
* मसाजमुळे मुलांना शांत झोप लागत असते. 
* मसाजमुळे मुलाचा शारीरिक व मानसिक विकास होत असतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती