akshaya tritiya upay: हे 7 पौराणिक उपाय, लक्ष्मीला दाखवतील घरचा रस्ता
संसारातील सर्व वस्तू विनाशकारी आहे. जीवांचे देह आणि त्यांने केलेल्या कार्यांचे फळ देखील नश्वर अर्थात नष्ट होणारे आहे. मनुष्याद्वारे केलेले सत्कर्म आणि दुष्कर्माचे फळ भुक्त झाल्यावर नष्ट होतात. या नश्वर जगात
काहीही स्थायी नाही परंतू आमच्या सनातनी परम्परेत एक दिवस असा येतो जेव्हा आम्ही केलेले कर्म व साधना अक्षय फलदायी होते आणि सदा- सर्वदा स्थायी होते. हा शुभ दिवस आहे - अक्षय तृतीया.
अक्षय अर्थात् कधी क्षय न होणारे. अक्षय तृतीयेला केलेली साधना, दान, सत्कर्म, दुष्कर्म अक्षय होकर सदा-सर्वदा फळ प्रदान करतात. म्हणून या दिवशी चुकुन देखील अशुभ कर्म करणे टाळावे. अक्षय तृतीयेचा पूर्ण दिवस
देव-आराधना, पूजा अर्चना, दान व धार्मिक रीत्या व्यतीत करावा.
अक्षय तृतीयेला सतयुगाचे प्रारंभ झाले होते. अक्षय तृतीयेला प्रभू परशुराम प्रकट झाले होते. अक्षय तृतीया साडे तीन मुहूर्तांपैकी एक आहे. वर्तमान युग अर्थप्रधान युग आहे. आज प्रत्येक व्यक्तीला कशाही प्रकारे धन प्राप्त करु
इच्छित आहे. धन प्राप्तीसाठी व्यक्ती कधी-कधी अनैतिक कर्म करायला देखील मागे-पुढे बघत नाही तरी असे करणे अनुचित आहे.
आमच्या शास्त्रांमधून असे अनेक धनदायक प्रयोग आहे जे अक्षय तृतीयेच्या दिवशी केल्याने धनाभाव दूर करुन धन प्राप्ती करता येऊ शकते. आज आम्ही आपल्याला असेच काही दुर्लभ धनदायक उपायांबद्दल माहिती देत आहोत
ज्यामुळे आपल्याला धनलाभ होऊ शकतो. आपल्याला हे उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रद्धापूर्वक अमलात आणायचे आहेत.
1. अक्षय तृतीयेला आपल्या देवघरात एकाक्षी नारळ लाल रंगाच्या कपड्यात बांधून स्थापित करावे. व्यापारी एकाक्षी नारळ आपल्या तिजोरीत ठेवू शकतात.