Maharashtra Tourism : छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत स्वराज्याच्या विस्तारासाठी अनेक किल्ले जिंकले आणि बांधले. त्यांनी स्वराज्याची स्थापना करताना 'गड-कोट' यांना सर्वोच्च महत्त्व दिले. "ज्यापाशी किल्ला, त्याचे राज्य" हे त्यांचे सूत्र होते. तसेच विविध ऐतिहासिक स्रोतांनुसार, त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी सुमारे ३०० ते ३७० किल्ल्यांवर नियंत्रण मिळवले होते, ज्यात जिंकलेले आणि नव्याने बांधलेले किल्ले समाविष्ट आहे. त्यांनी प्रथम किल्ला जिंकला तो वयाच्या १६ व्या वर्षी, आणि हे किल्ले मराठा साम्राज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठी महत्त्वपूर्ण होते.हे किल्ले शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा आणि रणनीतीचे प्रतीक आहे. त्यांनी काही किल्ले नव्याने बांधले जसे प्रतापगड (१६५६), सिंधुदुर्ग (१६६४), रायगड (राजधानी म्हणून बांधला, १६५६ मध्ये जिंकला आणि नूतनीकरण), सुवर्णदुर्ग इत्यादी. युनेस्कोने २०२५ मध्ये १२ मराठा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे, ज्यात राजगड, रायगड, तोरणा, साल्हेर, लोहगड, शिवनेरी, प्रतापगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, खंदेरी आणि गिंगीचा समावेश आहे.
इतर काही महत्त्वाचे किल्ले
लोहगड, विसापूर, तिकोना, प्रबळगड, जंजिरा (पद्मदुर्ग), कोलाबा, सुवर्णदुर्ग, जवळी, रोहिडा आणि अर्नाळा.