बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019 (12:06 IST)
गाईंसाठी राष्ट्रीय कामधेनू योजना आणणार, गाईंच्या प्रजाती सुधारणार - पियूष गोयल
ग्रामीण कुटुंबांना 8 कोटी मोफत LPG कनेक्शन पुरवण्याची योजना
बळीराजाला मोठ्ठी भेट; छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६,००० रुपये जमा होणार
- पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना जाहीर
- २ हेक्टर शेती असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा
- तीन हफ्त्यांमध्ये जमा होणार रक्कम
- १२ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार... १ डिसेंबर २०१८ पासून योजना लागू
- शेतकऱ्यांसाठी ७५ हजार कोटींचं पॅकेज जाहीर
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लहान शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दोन हेक्टरपर्यंत शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज संसदेत सादर केला. यावेळी मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान शेतकरी सन्मान योजना लागू करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून दोन हेक्टरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केले आहे.
जवळपास 12 कोटी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना या योजनेचा फायदा होणार आहे. ही योजना लागू करण्यासाठी वर्षाला 75 हजार कोटी रुपये इतका खर्च येणार असून हा सर्व खर्च केंद्र सरकार करण्यार आहे, असेही पीयूष गोयल यांनी सांगितले.