आता पुन्हा एकदा सुहानाच्या नव्या ग्लॅमरस लुकने चाहत्यांना वेड लावले आहे.सुहानाने इनस्टाग्राम तिचे साडीमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे. यात तिचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. सध्या तिचे हे फोटो अनेकांच्या पसंतीस पडत असून यावर लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, सुहाना लवकरच झोया अख्तरच्या द आर्चीजमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सुहानासोबत श्रीदेवीची धाकटी लेक खुशी कपूर आणि अगस्त्य नंदाही दिसणार आहेत. या चित्रपटातून सुहाना खानने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले आहे.