शाहरुखचा पठाण बॉक्स ऑफिसवर गाजला पण साऊथमध्ये पडला फिक्का

गुरूवार, 9 फेब्रुवारी 2023 (20:48 IST)
बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान याचा पठाण हा बहुचर्चित चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. चार वर्षानंतर किंग खान याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने दमदार फॉर्म दाखवला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम रचले.
 
हिंदी भाषेमध्ये पठाण चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले. मात्र, साऊथमध्ये शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाची हवा झाली नाही. पंधरा दिवसांमध्ये पठाण चित्रपटाने एकूण साऊथमध्ये १६.२० कोटींचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही पठाण चित्रपट रिलीज झाला. मात्र साऊथ मध्ये चित्रपट हवे तेवढे यश संपादित करू शकला नाही.
 
पठाण चित्रपटामुळे सुरुवातीला वादंग निर्माण झाला होता. मात्र या चित्रपटाला रिलीज होऊन आठवडा उलटून गेला तोच चित्रपटाची ताबडतोड कमाई सुरु झाली होती. सात दिवसांत जगभरात पठाण ने ६३४ कोटींची दमदार कमाई केली. आठ दिवसातील देशातील आकडा पहिला तर देशात पठाण ने ३४९.७५ कोटींची कमाई केली आहे. या कमाईसह पठाण हा देशात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सहभागी झाला. ‘पठाण’ने पहिल्याच दिवशी जवळपास ५४ कोटी रुपयांची कमाई केली होती. ताबडतोड कमाई करत पठाण चित्रपटाने ‘बाहुबली’ आणि ‘केजीएफ २’ सारख्या सुपरहिट चित्रपटांना देखील माघारी सोडलं.
 
‘पठाण’ने पहिल्याच दिवशी जवळपास ५४ कोटी रुपयांची कमाई केली असून आठव्या दिवशी ही कमाई देशात ३४९.७५ कोटींवर पोहचली आहे. तर हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. यशराज फिल्म्स निर्मित, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शन या चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांच्या भूमिका आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती