पठाण चित्रपटाच्या यशानंतर शाहरुख खानने पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. शाहरुख म्हणाला, "जगभरातील सिनेप्रेक्षक 'पठाण' चित्रपटाला चांगला प्रतिसाद देत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी 'पठाण'ला शुभेच्छा दिल्या आहेत. 'पठाण' चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल शाहरुखने दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, सिद्धार्थ आनंद यांचेही आभार मानले आहेत. शाहरुख खानने 'पठाण' चित्रपटाद्वारे चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले आहे. 'पठाण'पूर्वी त्याचा 'झिरो' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला. आता 'पठाण' चित्रपटाच्या यशानंतरच्या गेल्या चार वर्षांवर भाष्य करताना शाहरुख म्हणाला, "माझ्या या चार वर्षांच्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडल्या आणि काही वाईट गोष्टी घडल्या. या चार वर्षांत मी मुलांसोबत वेळ घालवला, त्यांना मोठं होताना पाहिलं".
चार वर्षांत त्याने काय केले याबद्दल बोलताना शाहरुख पुढे म्हणाला, मी प्लॅन बीचा विचार करून मी स्वयंपाक करायला शिकलो. मी इटालियन पदार्थ बनवायला शिकलो. लोक म्हणत होते की, आता माझे चित्रपट चालणार नाहीत. त्यामुळे मी रेस्टॉरंट उघडण्याचा विचार केला. लोकांना खूश करण्याचा प्रयत्न केला. आता 'पठाण' चित्रपटाच्या यशाने मी गेली चार वर्षे विसरलो आहे."