बच्चन यांना स्क्रीनवर पाहून सुनील ग्रोव्हरने उडीच मारली आणि एकदा नव्हे तर पुन्हा पुन्हा त्यांच्या पायांना स्पर्श केला

गुरूवार, 8 सप्टेंबर 2022 (08:47 IST)
बच्चन यांच्या ‘गुडबाय’ या चित्रपटाची सध्या चर्चा आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र त्याचीच चर्चा होत आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी अमिताभ बच्चन आणि सुनील ग्रोव्हर यांच्यात असे काही घडले की उपस्थितांना हसू आवरणंही कठीण झालं. ‘गुडबाय’मध्ये अमिताभ बच्चन यांच्याशिवाय सुनील ग्रोव्हरचीही भूमिका आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी संपूर्ण कलाकार उपस्थित होते, तर अमिताभ बच्चन घरबसल्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झाले होते.
 
अमिताभ बच्चन यांना स्क्रीनवर पाहून सुनील ग्रोव्हरने उडीच मारली आणि एकदा नव्हे तर पुन्हा पुन्हा त्यांच्या पायांना स्पर्श केला. त्याच्या या स्टाइलवर अमिताभही खूश होते. सुनील ग्रोव्हर जेव्हाही अमिताभ यांच्या पायाला स्पर्श करायचा तेव्हा ते त्याला आशीर्वाद द्यायचे आणि तो पुन्हा त्यांच्या पायांना स्पर्श करायचा. अमिताभ बच्चन आणि सुनील ग्रोव्हर यांच्यातील हा फनी स्टाइल व्हिडीओ पाहून कार्यक्रमात उपस्थित असलेले सगळेच हसू सागले. सुनील ग्रोव्हरच्या पायाला वारंवार हात लावल्यावर अमिताभ म्हणायचे, ‘हे घे पुन्हा एकदा घे. पुन्हा एकदा घे. घाबरून नकोस. मी तुला सोडणार नाही.’

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती