केजीएफ चॅप्टर 2 हा चित्रपट त्याच्या पहिल्या भागाच्या, केजीएफच्या मोठ्या यशानंतर सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाच्या भव्य-दिव्यतेचे आश्वासन देत निर्मात्यांनी संजय दत्तचा, वायकिंग्सचा क्रूर राजा, अधिराचा लुक मोठ्या अपेक्षेने अनावरीत केला. आज संजय दत्तच्या वाढदिवशी अधिराचा हा लूक संजय दत्तच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरली आहे.
केजीएफ चॅप्टर 1 ला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता, ज्याने केवळ भारतातच नव्हे तर सर्वत्र कोट्यवधी लोकांची मने जिंकली होती. निर्मात्यांनी वर्षभरापूर्वी केजीएफ चॅप्टर २ चे पहिले पोस्टर लाँच केले होते तेव्हा या रहस्यमयी अधीराची तोंडओळख करुन दिली होती.
पहिला चॅप्टरमध्ये यशच्या रॉकीने त्याच्या प्रतिस्पर्धी गरुडचा वध केला, ज्याने गुलामगिरी आणि क्रूरपणाने कोलारच्या सोन्याच्या खाणींवर नियंत्रण ठेवले होते. घटना घडल्यानंतर, अधीराने असे वचन दिले होते की गरुडा जिवंत आहे तोपर्यंत सोन्याच्या खाणी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार नाही. केजीएफच्या दुसर्या भागात आपल्याला अधीरा आणि रॉकी यांना सोन्याच्या खाणींवर जोरदार संघर्ष करत असताना दिसतील.
केजीएफ चॅप्टर 2, एका बाजूला प्रचंड मोठ्या अवकाशात तयार होणारा असा बहुप्रतीक्षित चित्रपट नेत्रसुखद आणि आश्चर्यजनक अनुभव देण्यासाठी तंत्रज्ञानाने समृद्ध होत आहे तर दुसऱ्या बाजूला यामध्ये सुपर रॉकिंग सुपरस्टार यश, संजय दत्त, रवीना टंडन यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या शानदार भूमिका असणार आहेत.
विजय किलागंदुरद्वारे निर्मित आणि प्रशांत नीलद्वारे दिग्दर्शित, केजीएफ 2ला एक्सेल एंटरटेनमेंटसारख्या प्रतिष्ठित नावांसोबत आणण्यात येत असून हा कन्नड, तमिळ, तेलगु, मल्याळम आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणारा बहुभाषी चित्रपट आहे.