Bollywood News : प्रसिद्ध विनोदी अभिनेता सुनील पाल काल अचानक गायब झाले. ते एका शोसाठी तो मुंबईबाहेर गेले होते, त्यानंतर ते बेपत्ता झाले. कॉमेडियन घरी न परतल्याने आणि त्यांचा फोन न सापडल्याने सुनीलची पत्नी सरिता पाल यांनी मंगळवारी मुंबई पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.
सुनील पाल यांनी 2005 साली 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' जिंकून लोकप्रियता मिळवली. यानंतर तो द ग्रेट इंडियन कॉमेडी शो, कॉमेडी चॅम्पियन्स आणि कॉमेडी सर्कस यांसारख्या अनेक शोमध्ये दिसला. सुनील पाल यांनीही अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.