अक्षय कुमार माझा रोल मॉडेल

गुरूवार, 19 जुलै 2018 (11:08 IST)
अक्षय कुमारबरोबर 'टॉयलेट एक प्रेमकथा'मध्ये काम केलेली भूमी पेडणेकर अक्षयलाच आपला रोल मॉडेल आणि इन्स्पिरेशन मानते आहे. आपण अक्षयकडून बरेच काही शिकल्याचे भूमी सांगते. भूमीला अक्षयबरोबर काम केल्यानेच स्टारडम  प्राप्त झाले, हे देखील ती विसरलेली नाही. 'टॉयलेट...'च्यावेळी अक्षयने आपल्याला खूप समजून घेतले आणि खूप मोलाचे मार्गदर्शनही केले. विशेषतः जबाबदारीने रोल निभावण्यासाठी त्याच्या सूचना खूप मोलाच्या होत्या, असे भूमी म्हणते. भूमी सध्या 'सोन चेरीया'मध्ये काम करते आहे. या सिनेमात तिच्याबरोबर सुशांत सिंह राजपूत दिसणार आहे. चंबळच्या खोर्‍यात सध्या या सिनेमाचे शूटिंग सुरू आहे. सुशांत सिंह राजपूत पहिल्यांदाच दरोडेखोराच्या गेट अपमध्ये दिसणार आहे. 'सोन चेरिया'चे शूटिंग सुरू असताना तिला शेखर कपूरच्या 'बॅन्डीट क्वीन'ची आठवण झाली. या रोलसाठी ती तब्बल तीन महिने तयारी करत होती. मात्र ङङ्गसोन चेरिया'मध्ये ती देखील सुशांत सिंह राजपूतबरोबर दरोडेखोर साकारणार आहे की नाही, हे मात्र समजू शकलेले नाही. 'सोन चेरिया'चे शूटिंग संपल्याचेही तिने इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. टॉयलेट.. पाठोपाठ आयुष्यमान खुराना बरोबरच्या 'शुभंगल सावधान'ला समाधानकारक यश मिळाल्याने ती सध्या खुशीत आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती