सलमानने हाथी भाईना अशी केली होती मदत

मंगळवार, 17 जुलै 2018 (17:26 IST)
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील डॉ. हंसराज हाथी ही भूमिका साकारणारे अभिनेता कवी कुमार आझाद य़ाचं काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. साधारपणे आठ वर्षांपूर्वी कवी कुमार यांच्यावर बॅरियाट्रीक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी त्यांचं वय जवळपास २६५ किलो होतं. या शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च सलमाननं केला होता.
 
आतापर्यंत सलमान खानने अनेक कलाकरांना त्यांच्या पडत्या काळात मदत केली आहे. मग ही मदत बॉलिवूडमधलं करिअर सावरण्यासाठी असो किंवा आर्थिक साहाय्य असो. अगदी तशीच आर्थिक मदत कवी कुमार यांना केली असल्याची कबुली त्यांच्या भावाने दिली आहे.   कवी कुमार यांच्यावर आठ वर्षांपूर्वी बॅरियाट्रीक सर्जरी करण्यात आली होती. यावेळी सर्जरीचा, औषधपाण्याचा आणि वॉर्डचा खर्च सलमाननं केला होता. या सर्जरीनंतर कवी यांचं वजन २६५ किलोवरून १४० किलोपर्यंत कमी झालं होतं.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती