अनुष्काच्या या फोटोंवर चाहत्यांनी खूप प्रेम केले आहे आणि काही मजेदार कमेंट्स देखील केल्या आहेत.यूजरने कमेंट करताना 'विराट भैया किधर है' असा प्रश्न केला. कमेंट करताना दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, 'ट्राफिकमध्ये तुमचा सेल्फी चांगला दिसत आहे'.
या फोटोंमध्ये अनुष्का शर्मा व्हाइट डीपनेक टॉपमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने गळ्यातील साखळी आणि काळ्या डिझायनर शेड्ससह तिचा लूक पूर्ण केला. दुसरीकडे, अनुष्का सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, जिथे ती तिचे प्रत्येक अपडेट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते. कामाच्या आघाडीवर अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच 'चकदा एक्सप्रेस' या चित्रपटात दिसणार आहे.