सेक्रेड गेम्सया नेटफ्लिक्सच्या पहिल्या ओरिजनल वेबसीरिजचा पहिला सीजन तुफान गाजला. इतका की, पहिल्या सीझननंतर याचा दुसरा सीझन कधी एकदा येतो, असं चाहत्यांना झालं होतं. अखेर दुसरा सीझनही आला. अर्थात हा सीझन पहिल्या सीझन इतका गाजला नाही. पण तरिही या सीझनची चर्चा झाली होती. आता चाहत्यांना या लोकप्रिय वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा आहे. तुम्हीही सेक्रेड गेम्सच्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत असाल तर ही बातमी तुमची निराशा करणारी आहे.
होय, सेक्रेड गेम्सचा तिसरा सीझन बनणार नाहीये. दिग्दर्शक अनुराग कश्यपने तसा खुलासा केला आहे. यामागचं कारणही त्याने सांगितलं. होय, अनुराग कश्यपचं खरं मानाल तर, तांडव या सैफ अली खानच्या वेबसीरिजमुळे सेक्रेड गेम्स ३चा बेत रद्द करण्यात आला आहे.
याविषयीच बोलताना अनुराग म्हणाला, “नेटफ्लिक्समध्ये आता सेक्रेड गेम्स ३ प्रेक्षकांसमोर आणण्याएवढी हिंमत राहिलेली नाही, कारण तांडवमुळे निर्माण झालेल्या वादामुळे बरेच ओटीटी प्लॅटफॉर्म हे घाबरले आहेत.” सेक्रेड गेम्स ही सीरिज अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने आणि नीरज घायवान यांनी मिळून दिग्दर्शित केली होती.
Edited by : Ratnadeep Ranshoor