अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपट 'पुष्पा-2' 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याचा प्रीमियर हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. येथे गर्दी वाढल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. महिला 35 वर्षांची होती. महिलेच्या मृत्यूनंतर पोलिसांनी अल्लू आणि थिएटरच्या व्यवस्थापनाविरुद्ध याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. आता याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि त्याचा अंगरक्षक संतोष यांना शुक्रवारी अटक केली आहे. हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात नेले असून, तेथे त्याची याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे.