अजय देवगण तमिळ फिल्म 'कैथी' च्या रिमेकमध्ये दिसणार

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण २०२१ च्या सुरूवातीला एका तमिळ फिल्मच्या रिमेक मध्ये मुख्य भुमिकेत दिसणार आहे. तमिळ मधील कैथी या सिनेमातून अजय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याची माहिती अजयने ट्विटरद्वारे दिली आहे. 
 
अजय देवगणच्या तान्हाजी द वॉरीयर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात गाजला आणि यानंतर आता एका नव्या चित्रपटाचे रिमेक करत असल्याची माहिती त्याने ट्विटर द्वारे दिली आहे. ट्विटरवर त्याने म्हटले आहे की,’ मी तमिळ सिनेमा कैथीचा हिंदीतून रिमेक करत आहे. हा सिनेमा येणाऱ्या काळात १२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत प्रदर्शित होईल’ असे त्याने सांगितले आहे.  हा एक अॅक्शन सिनेमा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती