ऐश्वर्या राय बच्चनच्या वडिलांचे निधन

फिल्म अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांचे वडील कृष्णराज राय यांचे मुंबईत 18 मार्च रोजी निधन झाले. त्यांनी लीलावती दवाखान्यात शेवटचा श्वास घेतला जेथे त्यांना दोन आठवडे आधी भरती करण्यात आले होते. त्यांचे आरोग्य जास्त बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले. नंतर त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.  
 
ऐश्वर्या त्यांची देखरेख करत होती. अभिषेक बच्चन कामानिमित्त न्यूयॉर्कमध्ये होता आणि ऐश्वर्यावर सर्व जबाबदारी होती.  
 
ऐश्वर्याचे वडील कर्करोगाने पीडित होते. ठीक झाल्यानंतर परत त्याचे लक्षण दिसल्यामुळे त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले होते. पण या वेळेस त्यांच्या आरोग्यात सुधार दिसला नाही आणि त्यांनी आज दवाखान्यात शेवटचा श्वास घेतला. 

वेबदुनिया वर वाचा