पंजाबमध्येही चित्रपटाविरुद्ध निदर्शने झाली. ख्रिश्चन समुदायाने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. 'जाट' चित्रपटाबाबत सनी देओल, रणदीप हुड्डा, विनीत कुमार सिंग, दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी आणि निर्माते नवीन मालिनेनी यांच्याविरुद्ध जालंधरच्या सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वृत्तानुसार, 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाभोवती वाद सुरू आहे. तथापि, सनी देओल अभिनीत 'जाट' चित्रपटातील वाद निर्माण करणारा सीन आता काढून टाकण्यात आला आहे. निर्मात्यांनी ही माहिती देणारे अधिकृत निवेदन जारी केले आहे आणि माफी देखील मागितली आहे.
'जाट' चित्रपटातील चर्चच्या दृश्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप ख्रिश्चन समुदायाने केला. पंजाबमध्येही चित्रपटाविरुद्ध निदर्शने झाली. ख्रिश्चन समुदायाने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. निर्मात्यांनी सांगितले की, आमचा हेतू कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता. आम्हाला याबद्दल खूप वाईट वाटते आणि आम्ही चित्रपटातून हे दृश्य काढून टाकण्यासाठी तात्काळ कारवाई केली आहे.
'जाट' चित्रपटाबाबत सनी देओल, रणदीप हुड्डा, विनीत कुमार सिंग, दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी आणि निर्माते नवीन मालिनेनी यांच्याविरुद्ध जालंधरच्या सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावल्याबद्दल या सर्वांविरुद्ध बीएनएसच्या कलम 299 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.