प्रसिद्ध चिनी गायक, अभिनेता आणि मॉडेल यू मेंगलोंग यांचे निधन झाले. ते अवघ्या ३७ वर्षांचे होते. यू मेंगलोंग यांच्या व्यवस्थापन पथकाने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की यू मेंगलोंग यांचे बीजिंगमधील इमारतीवरून पडून निधन झाले.
यू मेंगलोंग यांच्या अचानक निधनाने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. ३७ वर्षांच्या तरुण वयात त्यांनी चाहत्यांमध्ये एक जबरदस्त ओळख निर्माण केली होती. मेंगलोंग यांना २०१३ मध्ये 'सुपर बॉय' या चिनी गायन रिअॅलिटी शोमध्ये भाग घेऊन पहिल्यांदा लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ते अभिनयाकडे वळले. मेंगलॉन्गने 'गो प्रिन्सेस गो' या वेब सिरीजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती, ज्यामुळे त्याची लोकप्रियता आणखी वाढली.