आंध्रप्रदेशातील 10 खास प्रेक्षणीय समुद्री तट

बुधवार, 2 जून 2021 (19:47 IST)
पृथ्वीच्या 70.8 टक्के भागात समुद्र आहे.त्यापैकी 14 टक्के भाग विशाल हिंद महासागरानें व्यापलेला आहे. भारत देश तिन्ही बाजूने  समुद्राने वेढलेला आहे.त्यातील 13 राज्ये त्याच्या सीमेवर आहे.या समुद्रतटावरून समुद्राला बघणे खूपच रोमांचकारी अनुभव आहे.    
ही राज्ये पुढीलप्रमाणे आहेत- 1आंध्र प्रदेश, 2 पश्चिम बंगाल, 3 केरळ, 4 कर्नाटक, 5 ओरिसा, 6 तमिळनाडू, 7 महाराष्ट्र, 8 गोआ, 9 गुजरात, 10 पुडुचेरी, 11अंदमान-निकोबार,12 दमण-दीव आणि 13 लक्षद्वीप. चला आज आंध्र प्रदेशातील प्रमुख किनाऱ्या विषयी माहिती जाणून घेऊ या.तथापि, आंध्र प्रदेश आता विभाजित केले आहे. तेलंगणाचे नवीन राज्य अस्तित्त्वात असल्यास खालील माहिती एकत्रितपणे देण्यात येत आहे.
हैदराबादला दहा वर्षासाठी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची संयुक्त राजधानी म्हणून बनवले आहे. यानंतर अमरावती आंध्र प्रदेशची नवीन राजधानी होईल.
इतिहासकारांच्या मते, आंध्रप्रदेश हे आर्य जातीचे स्थान आहे, परंतु इ.स.पू. 236 पासून त्याच्या इतिहासाची माहिती उपलब्ध आहे. असे म्हटले जाते की आंध्र हे एका जातीचे नाव होते. ऋग्वेदाच्या  आख्यायिकेनुसार ऋषी विश्वामित्रांच्या शापांमुळे त्याचे 50 पुत्र आंध्र, पुलिंदा आणि शबर झाले. ऐतरेय ब्राह्मण आणि महाभारतात आंध्रांचा  उल्लेख आहे.विष्णू पुराणातही या जातीच्या लोकांचा उल्लेख आढळतो.'कोसलान्ध्रपुंड्रताम्रलिप्त समुद्रतट पुरीं च देवरक्षितो रक्षित:'.आंध्रावर अशोक, सातवाहन, शक, इक्ष्वाकू, पूर्व चालुक्य आणि काकतीय, विजयनगर आणि कुतुबशाही राज्यकर्ते होते आणि नंतर मीर कामरुद्दीनच्या राजवटीत हा प्रदेश 17 व्या शतकापासून ब्रिटिशांच्या ताब्यात होता. इथली भाषा तेलगू असून नन्नय भट्ट इथले   पुरातन कवी आहेत.
 
1 मंगिनापुडी तट-1. मंगिनापुडी तट आपल्या सौंदर्येसाठी ओळखले जाते.हे ऐतिहासिक पट्टण शहर देखील आहे.या तटाचे सौंदर्य नैसर्गिक रूपात आहे.किनाऱ्यावर येणाऱ्या समुद्री लाटा मंगिनापुडी तटाचे चे सर्वात मोठे आकर्षण आहे. प्राचीन काळी त्याची बंदरे भारताचा प्रवेशद्वार म्हणून वापरली जात होती.
 
2 भीमूनिपट्टनम तट-निळे पाणी आणि नारळाचे उंच झाडांमध्ये वसलेले भीमूनिपट्टनम तट मनाला शांती देतो.हे तट मनोरंजनासाठी एक उत्तम ठिकाण आहे.हा मोहक समुद्र किनारा अतिशय सुंदर आणि नयनरम्य आहे.आंध्र प्रदेशच्या किनारी भागात वसलेल्या या किनाऱ्याचे सौंदर्य बघण्यासारखे आहे.
 
3 माईपाडू तट -आंध्रचा दुसरा किनारा म्हणजे माईपाडू तट.येथे एक समुद्रकिनारा जबरदस्त आकर्षक दृश्य आणि सोनेरीरंगाचा सूर्य तट आहे.जे बारीक वाळू आणि सौम्य लाटा देऊन मन मोहतो.आपल्या अनुभवाला अविस्मरणीय करण्यासाठी कोसळणाऱ्या लाटांमध्ये बोटीवर जाण्याचा आनंद घ्यावा.
 
4 वोडारेवू तट-शहरी धकाधकीच्या जीवनामुळे कंटाळलेल्या लोकांसाठी वोडारेवू तट विश्रांती आणि आनंदांनी परिपूर्ण ठिकाण आहे. उगवत्या समुद्राच्या लाटा आणि उसळणारे समुद्र मनाला ताजेतवाने करते. प्रकाशम जिल्ह्यातील जिराळापासून केवळ 6 कि.मी. अंतरावर वोडारेवू समुद्रकिनारा आहे.
 
5 . रामकृष्‍णा तट-आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर वसलेला हा समुद्र किनारा बंगालच्या उपसागराला जोडला गेला आहे आणि निसर्गरम्य दृश्य मंत्रमुग्ध करणारे आहे. खरोखरच येथे विहंगम दृश्य तुलना करण्यापलीकडे आहे. रामकृष्ण तट हा पवित्र जल आणि सुंदर परिसर असलेला सर्वात लोकप्रिय समुद्र किनारा आहे.
 
6  ऋषिकोंडा तट- आपण सुट्टीचा विचार करीत असाल तर ताबडतोब ऋषीकोंडा बीचवर जा.अस्पर्श वाळूचे मैदान आणि उष्ण समुद्राच्या लाटा.इथले सौंदर्य वाढवून एक नवे अनुभव देतात.
विशाखापट्टणमपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेले ऋषीकोनडा तट हे सोनेरी वाळूने बनविलेले एक सुंदर ठिकाण आहे. इथे एक टेकडी कॉटेज आहे.पोहणारे आणि जलक्रीडा प्रेमींना स्काईंग आणि विंड सर्फिंग साठी हे आदर्श ठिकाण आहे.
 
7 सूर्यलंका तट- आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात स्थित सूर्यलंका तट  पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. हा समुद्र किनारा हैदराबादपासून 319 कि.मी. अंतरावर आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत डॉल्फिन्स दिसू शकतात.
 
8 मछलीपट्टनम तट -विकेंड साजरा करायचा असल्यास एखाद्या हिल स्टेशन किंवा दूरवर जागेवर जाण्याऐवजी आपण मछलीपट्टनम तट फिरायला येण्याची योजना आखू शकता. सौंदर्य दृष्टीने या समुद्र किनाऱ्याला काहीच जोड नाही. कृष्णा डेल्टा जवळ या समुद्र किनार्‍यावरून समुद्राचे दृश्य बघून खूप आनंद होतो. दरम्यान, आपण फिशिंग बोट भाड्याने घेऊन डेल्टा देखील फिरायला जाऊ शकता.
 
9 यनम तट -गोदावरी आणि कोरिंगा नदीच्या संगमा वर असलेले यनम तट येर्थे सूर्याच्या किरणा निळ्या पाण्यावर पडतात तर इथले दृश्य आश्चर्यकारक दिसते.या ताटाच्या समोर भगवान शिव,येसू भारत माताची मूर्ती आहे.या तटावर हे मोठे शिवलिंग आकर्षणाचा केंद्र आहे.
 
10 उडप्पा तट-चकाकणाऱ्या पांढऱ्या वाळू,भला मोठा किनारा आणि स्वच्छ पाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या समुद्री किनाऱ्यावर आपण फिशिंगचा आनंद घेऊ शकता.या साठी आपण फिशिंग बोट भाडे तत्वाने घेऊन स्थानिक लोकांसह खोल पाण्यात जाऊन फिशिंग देखील करू शकता.जर हे करावेसे वाटत नसल्यास जॉगिंग करू शकता,फुटबॉल खेऊ शकता किंवा आपल्याला जे वाटेल ते करा. 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती