Knee Pain गुडघेदुखीपासून मुक्त होण्यासाठी योगासन

शुक्रवार, 16 डिसेंबर 2022 (13:31 IST)
वृद्धत्वानंतर सांधे आणि गुडघेदुखी सुरू होते. पण हिवाळ्यात गुडघे आणि सांधेदुखीची समस्या वाढते. याचे एक मुख्य कारण शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणे देखील असू शकतं. याशिवाय जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने हिवाळ्यात गुडघेदुखीची तक्रार वाढू शकते. ही वेदना कमी करण्यासाठी स्नायूंना बळकट करणे गरजेचे आहे. यासाठी योगाभ्यास प्रभावी असून याने पायातील रक्ताभिसरण चांगले होते आणि गुडघेदुखीपासून आराम मिळतो. गुडघे मजबूत करण्यासाठी योगा करावा. योगाच्या नियमित सरावाने पाय, घोटे, मांड्या आणि गुडघे मजबूत होतील.
 
त्रिकोणासन
या योग आसनाच्या सरावाने स्नायूंचा त्रास कमी होतो. त्रिकोणासन करण्यासाठी सरळ उभे रहा. मग पायांमध्ये सुमारे दोन फूट अंतर ठेवा. दीर्घ श्वास घेताना शरीर उजवीकडे टेकवा. नंतर डावा हात वरच्या दिशेने हलवा. आपले डोळे देखील डाव्या हाताच्या बोटांवर ठेवा. काही वेळ या आसनात राहा. नंतर सामान्य स्थितीत या. आता दुसऱ्या बाजूने या प्रक्रियेचे अनुसरण करा.
 
मलासन
मलासनाचा सराव करण्यासाठी सरळ उभे राहा. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा. आता हात प्रार्थनेच्या मुद्रेत आणा. हळू हळू बसा. श्वास सोडताना पुढे वाका. दोन्ही कोपर मांड्यांमध्ये 90 अंशाच्या कोनात आणा. सामान्यपणे श्वास घ्या. नंतर सामान्य स्थितीत सरळ उभे रहा.
 
आसनाची योग्य स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही तज्ञांशी संपर्क साधू शकता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती