योगासनांना जीवनाचा भाग बनवायचा आहे? या आसनांनी सुरुवात करू शकता

सोमवार, 10 जानेवारी 2022 (21:01 IST)
विविध आरोग्य फायद्यांसाठी योगासनांचा भारतात हजारो वर्षांपासून सराव केला जात आहे.अभ्यासातून असे दिसून आले आहे की नियमितपणे योगाभ्यास केल्याने विविध प्रकारचे आरोग्यदायी फायदे होतात. शरीर बळकट करण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी योगाभ्यास हा एक चांगला पर्याय असू शकतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कोणत्याही उपकरणाशिवाय घरी बसूनही योगाभ्यास करता येतो.
आरोग्य तज्ञ सांगतात की कोणत्याही वयोगटातील लोक योगाभ्यास करू शकतात. ते सुरू करण्यासाठी वय नाही. जर आपण देखील योगासने सुरू करण्याचा विचार करत असाल तर याची सुरुवात काही हलक्या पातळीच्या योगासनांनी करता येते.  चला तर मग जाणून घेऊया कोणत्‍या योगासनांसह योगासने सुरू केल्‍याने सर्व प्रकारचे आरोग्य लाभ मिळू शकतात. 
 
1 सूर्यनमस्कार योगाचा सराव - जर आपण आपल्या दैनदिनाच्याजीवनशैलीत योगाचा समावेश करण्याचा विचार करत असाल तर त्याची सुरुवात सूर्यनमस्कार योगाने करता येईल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी सूर्यनमस्कार योगाचा सराव आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या योगाचा अभ्यास शरीरातील लवचिकता वाढवण्यासोबत रक्तप्रवाह सुधारण्यासाठी फायदेशीर मानला जातो
 
2 बालासन योगाचा सराव- बालासन योगाचा सराव सामान्यतः सोपा मानला जातो आणि त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. पाठ, नितंब आणि हाताच्या स्नायूंना ताणण्यासह मज्जासंस्थेला आराम देण्यासाठी ही मुद्रा खूप फायदेशीर मानली जाते. दीर्घ श्वासोच्छवासाच्या व्यायामासह बालासन योगाचा सराव केल्याने मन शांत होते आणि चिंता आणि थकवा कमी होतो.
 
3 वृक्षासन योगाचा सराव -वृक्षासन योग किंवा ट्री पोज हे संतुलन सुधारण्यासाठी तसेच नितंबाच्या सभोवतालचे स्नायू ताणण्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. या योगाभ्यासामुळे कंबर, मांडी, नितंब आणि पेल्विक अवयवांना स्थिरता मिळण्यास मदत होण्यासोबतच गाभा मजबूत होतो. योगाच्या सुरुवातीच्या दिवसांत हे व्यायाम करणे फायदेशीर ठरू शकते.
 
टीप : कोणतेही योग सुरु करण्यापूर्वी तज्ञांच्या सल्ला घ्यावा आणि विशेष योगगुरूच्या सानिध्यात  या योगांचा सराव करावा 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती