श्वास संबंधी आजारांसाठी दररोज भुजंगासनाचा सराव करा

बुधवार, 30 जून 2021 (16:53 IST)
भुजंगासन याला कोबरा पोझ देखील म्हणतात.कारण हे करताना शरीराची आकृती फण काढलेल्या सापासारखी दिसते.हे आसन शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.हे आसन शरीराला लवचीक बनवतो,तसेच पाठ,मान,आणि पाठीचा कणा देखील मजबूत करतो.याचा सराव करताना हळू हळू श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा सराव करा. चला हे आसन करण्याची पद्धत आणि त्याचे फायदे जाणून घेऊ या.
 
भुजंगासन करण्याची पद्धत-
 
 सर्वप्रथम पोटावर झोपा.पाय सरळ ठेवा,पाय आणि टाचा एकत्र करा.दोन्ही हात दोन्ही खांद्याच्या बरोबर ठेवा आणि कोपरे शरीराला लागून ठेवा.दीर्घ श्वास घेत कपाळ,छाती आणि पोटाला वर उचला.शरीराला दोन्ही हाताच्या आधार घेत कंबर मागे ओढा.दोन्ही हातांवर संतुलन बनवा.हळू-हळू श्वास घेत पाठीच्या कणाला ताठ करून हात सरळ करून वर बघा.
 
भुजंगासन करण्याचे फायदे-
 
 *श्वासाच्या रोगांमध्ये हे आसन करणे फायदेशीर आहे.
* ताण आणि अशक्तपणा पासून आराम मिळतो.
* पाठ,मान,आणि खांद्याच्या वेदनेपासून आराम मिळतो.
* कंबरेचा भाग लवचिक बनवतो.
* पोटाचा लठ्ठपणा कमी करतो.
 
टीप -गरोदर स्त्रिया किंवा ज्यांच्या पाठीत काही समस्यां आहे ,पोटाची शस्त्रक्रिया झाली असल्यास त्यांनी या आसनाचा सराव करू नये.बऱ्याच काळापासून शरीरात काही वेदना असल्यास तर प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय या आसनाचा सराव करू नये.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती