मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स ते दिल्लीतील हजरत निजामुद्दीन दरम्यान धावणारी राजधानी ( Rajdhani Express ) विशेष रेल्वे गाडी आता 1 जुलैपासून पासून दररोज धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
करोनाच्या दुसर्याध लाटेमुळे प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे या गाडीच्या फे-या कमी करण्यात आल्या होत्या. परिस्थिती सुधारू लागल्याने काही दिवसांपूर्वी राजधानी एक्सप्रेस आठवड्यातून चार दिवस सोडण्यात येऊ लागली.
आता ती पूर्वीप्रमाणेच दररोज धावणार असल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. ही गाडी बंद असल्याने व्यावसायिक, उद्योजक, पर्यटक आदींना विमानाने जास्त पैसे देऊन दिल्ली गाठावी लागत होती.
आता त्यांची सोय झाली आहे. गाडीचे बुकिंग यापूर्वीच सर्व पीआरएस केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू झाले आहे.