Correct Posture या चार स्टेप्सने पॉश्चर योग्य ठेवा

शुक्रवार, 9 डिसेंबर 2022 (17:02 IST)
शारीरिक रचना ही निसर्गाची देणगी असली तरी बदलत्या जीवनशैलीमुळे आता पॉश्चर बिघडू लागले आहे. याचे निराकरण करण्यासाठी काही व्यायाम सुचवले जातआहेत. बैठी जीवनशैलीमुळे आपल्या शारीरिक स्थितीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. सतत बसणे, झोपून टीव्ही पाहणे, वाकून बसणे, खांदे झुकवून चालणे इ. यावर उपाय करण्यासाठी काही आसने प्रभावी आहेत. तर चला जाणून घ्या योग्य व्यायाम-
 
स्टेप 1: योगा मॅटवर पोटावर झोपा. पाय सरळ ठेवा. कंबरेपासून वर येताना हातांना कोपर आणि तळवे टेकवून आराम करा. 20-30 सेकंद या स्थितीत रहा. नंतर प्रक्रिया पुन्हा करा. हा व्यायाम सुरुवातीला 5-7 वेळा करा. मग सोयीनुसार वेळ वाढवा.
 
स्टेप 2: पोटावर झोपाावे परंतु पाय गुडघ्यांपेक्षा वर उचलावे. दोन्ही तळवे छातीजवळ ठेवून त्यांचा आधार घेऊन कमरेपासून वर जावे. 30-40 सेकंद या स्थितीत रहा आणि नंतर प्रक्रिया पुन्हा करा. सुरुवातीला असे दिवसातून 5-7 वेळा करा. नंतर सोयीनुसार वाढवा.
 
स्टेप 3: पोटावर झोपा. तुमचे पाय आणि शरीराचा वरचा भाग वर करा. हात मागे ठेवून हवेत ठेवा. 10 ते 20 सेकंद या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला हा व्यायाम 5-6 वेळा करा. मग हळूहळू वेळ वाढवा.
 
स्टेप 4: पोटावर झोपा आणि आपले हात, डोके आणि पाय हवेत उभे करा. 5-10 सेकंद या स्थितीत रहा आणि नंतर सोयीनुसार वेळ वाढवा. हा व्यायाम देखील 5-6 वेळा करावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती