कोरोना काळात दीर्घ श्वासाला किती महत्त्व आहे हे सर्वांना कळून आलं आहे. योग्य पद्धतीने श्वासोच्छवास करणं फायदेशीर असल्याचं जाणवतं आहे. सध्याच्या काळात श्वास घेण्याची योग्य पद्धत आत्मसात करण्यावर अधिक भर देत असल्याचं दिसून येत आहे. याने अधिकाअधिक ऑक्सिजन शरीरात घेता येईल. याने रक्तप्रवाह सुरळीत होतं आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यासाठी योग्य पद्धत जाणून घ्या-
खोल श्वास घेण्याची पद्धत
आरामात बसून नाकात श्वास घेत असताना हळूहळू पोट हवेने भरा. नंतर आपल्या नाकातून हळूहळू वारं काढून टाका. ही क्रिया करत असताना एक हात आपल्या पोटावर आणि दुसरा हात छातीवर ठेवा. आपण आडवे होऊन देखील ही क्रिया करु शकता. हळूहळू श्वास घेत असताना पोटात हवा भरण्याची क्रिया जाणवते. त्याच वेळी, श्वासोच्छ्वास घेताना, आपण पोटात जात असल्याचे देखील जाणवते.