फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी दररोज हा व्यायाम करा

शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (18:30 IST)
शरीराला मानसिक आणि शारीरिकदृष्टया तंदुरुस्त ठेवणे आवश्यक आहे. शरीरांच्या सर्व अवयवांच्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या योगासनांचा सराव केल्याने आरोग्यदायी फायदे मिळतात.अंतर्गत समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी देखील योगासन फायदेशीर आहे .

फुफ्फुसांना निरोगी आणि बळकट ठेवण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. वाढत्या प्रदुषणांमुळे फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेवर प्रभाव पडतो.फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी दोरीच्या उड्या करणे फायदेशीर ठरते. हे केल्याने फुफ्फुसांचे स्नायू बळकट होतात. फुफ्फुसांच्या विस्तार आणि आकुंचन दर सुधारण्यासाठी दोरीच्या उड्या मदत करतात. दिवसातून 5 ते 10 मिनिटे दोरीच्या उड्या मारल्याने फुफ्फुस निरोगी होतात. 
 
त्वचेसाठी फायदेशीर दोरीच्या उड्या- 
दोरीच्या उड्या मारल्याने फुफ्फुसांनाच नव्हे तर त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. हे केल्याने चेहऱ्यावरील रक्ताभिसरण वाढते आणि त्वचेला रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा होतो. हा व्यायाम केल्याने घाम येऊन त्वचेची छिद्रे उघडतात. या मुळे शरीरातील सर्व घाण आणि जंत निघण्यास मदत होते. आणि त्वचा स्वच्छ होते. या शिवाय दोरीच्या उड्या केल्याने वजन नियंत्रित राहते, हाडे आणि स्नायू मजबूत होतात आणि एकाग्रता सुधारते. 
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited by - Priya Dixit  
 
 
   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती