कोणत्याही स्पर्धा परीक्षेत चांगली कामगिरी दाखविण्यासाठी एकाग्रता खूप महत्त्वाची आहे. एकाग्रता शिवाय तासंतास अभ्यासाला बसणे अशक्य आहे.बऱ्याच वेळा तरुण तणावाला बळी पडतात आणि त्यांची एकाग्रता विस्कळीत होते,अशा परिस्थितीत त्यांना अभ्यास करणे अवघड होतं. कारण कोणत्याही कामात त्यांचे लक्ष लागत नाही. अशा परिस्थितीत आवश्यक आहे अभ्यासाला बसण्यापूर्वी काही योगासन आपल्या जीवनात समाविष्ट करावे जेणे करून आपले संपूर्ण लक्ष अभ्यासाकडे केंद्रित होईल.या आसनाच्या सरावाने एकाग्रता वाढते मनाला शांती देखील मिळते. चला तर मग त्या आसना बद्दल जाणून घेऊ या.
* उष्ट्रासन-
हे आसन शरीराला मागे वाकवून केले जाते. हे आसन करताना शरीराची स्थिती उंटाप्रमाणे असते. हे आसन केल्यानं शरीरातील सर्व चक्र चांगले राहतात, हे एकाग्रतेसह मनात संतुलन करतो. हे नसांना सक्रिय करण्यासह आळस दूर करतो. हे आसन केल्याने संपूर्ण दिवस ऊर्जा राहते. हे बिघडलेली जीवनशैलीला देखील सुधारतो.
* गरुडासन-
हे आसन करायला सोपं आहे. हे करण्यासाठी शरीराचे संतुलन बनवून ठेवा. शरीराचे संतुलन राखण्यासाठी एकाग्रता आवश्यक आहे, जी एकाग्रता हे आसन केल्याने मिळते.गरुडासन पायाच्या स्नायूंना देखील बळकट करतो. हे आसन केल्याने मनातील सर्व नकारात्मक विचार मेंदूतून बाहेर पडतात आणि मेंदूत सकारात्मक विचारांचा संचार होतो. किमान 10 सेकंद तरी या आसनाचा नियमानं सराव करावा.