कंबर दुखीपासून हे 4 योग आराम देतील

शुक्रवार, 8 जानेवारी 2021 (08:32 IST)
बऱ्याच लोकांना कंबर दुखीचा त्रास होतो. थोडे देखील उठ बस करताना कंबरेत वेदना होते आजकाल तर तरुणांमध्ये देखील हा त्रास उद्भवत आहे. बरेच लोक चिकित्सकांना दाखवतात, औषध देखील घेतात पण वेदना कमी होत नाही. अशा लोकांनी एकदा तरी योग करून बघावे. योग केल्याने त्यांना कंबर दुखीच्या वेदनेपासून शक्य तितक्या आराम मिळेल. चला तर मग जाणून घ्या की कोणते योगा केल्याने कंबरेच्या वेदनेपासून आराम मिळतो.
 
1 चक्रासन 
चक्रासन केल्याने शरीराची मुद्रा चाका सारखी दिसू लागते. म्हणून हे नाव दिले आहे. कंबरेच्या दुखण्यात हे आसन फायदेशीर आहे पण हे हळू-हळू करावं. हे लक्षात ठेवा की कंबरेला ताण येऊ नये. या साठी सर्वप्रथम जमिनीवर झोपा, आता डोक्याच्या मागील बाजूस तळहाताला जमिनीवर ठेवून शरीराचे सर्व वजन हात आणि पायावर टाकून हळुवारपणे शरीराला वर उचलण्याचा प्रयत्न करा.
 
2 ताडासन 
कंबरदुखीपासून मुक्त होण्यासाठी ताडासन एक चांगले आसन असल्याचे सिद्ध आहे. लोक ह्या आसनाचा सराव म्हणून देखील करतात कारण हे करायला सहज आणि सोपं आहे. हे करण्यापूर्वी सर्वप्रथम सरळ उभे राहा. दोन्ही पायात खांद्याच्याप्रमाणे अंतर राखा. दोन्ही हात डोक्याच्या वर हाताचे बोटे एकमेकात फसवून जेवढे शक्य असेल श्वास धरून वरील बाजूस घेऊन खांद्यावरून ओढून खेचून घ्या आणि टाचा देखील उचला.
 
3 भुजंगासन 
कंबर दुखीला लवकरात लवकर दूर करण्यासाठी भुजंगासन करायला सुरू करा. हे करण्यासाठी आपण सर्वप्रथम सरळ जमिनीवर पाठीवर झोपा. नंतर हळूच हाताला छातीच्या समान अंतरावर ठेवा. नंतर कंबरेपासून नाभी पर्यंतच्या भागाला हळू-हळू श्वास भरून वर उचला. कंबरेमध्ये होणाऱ्या ताणला अनुभव करून हळू-हळू श्वास सोडत खाली या.
 
4 पर्वतासन
हे एक चांगले आणि सोपे आसन आहे. हे करण्यासाठी आपण जमिनीवर पोटावर झोपा. आता हातापायाच्या साहाय्याने शरीराला उचलण्याचा प्रयत्न करा. असं केल्याने पर्वतासारखा आकार बनतो. प्रयत्न करा की गुडघे आणि कोपर वळवू नका. हे नियमाने 15 ते 20 सेकंद केल्याने चांगले परिणाम मिळतील.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती