1 अंग संचलन : हे योग आसनांच्या सुरुवातीस करतात. जसे आपण व्यायाम करण्याआधी स्वतःला वॉर्म अप करतो त्याच प्रमाणे योगासनांच्या पूर्वी अंग संचलन केले जाते. या साठी आपण आपल्या मानेला, मनगटीला, पायांची बोटं, आणि कंबरेला क्लॉकवाइज आणि एंटी क्लॉकवाइज फिरवा.
2 ध्यान : जेव्हा आपण डोळे मिटून बसतो त्यावेळी ही तक्रार अनेकदा येते की जगभराचे विचार मनी ध्यानी येतात. भूतकाळातील गोष्टी किंवा भविष्याचा विचार, कल्पना, काहीही न काही विचार मेंदूत फिरत असतात. या पासून सुटका कसा मिळवता येईल?
असे मानले जाते की जो पर्यंत विचार आहे तो पर्यंत आपले ध्यान लागू शकत नाही. आपल्याला आपले डोळे निमूटपणे बंद करून बसून विचारांच्या हालचाली कडे बघावयाचे आहे. ध्यान करण्यासाठी सुरुवातीस आपणं आपल्या श्वासाच्या गती आणि मानसिक हालचाली वरच लक्ष केंद्रित करावं. श्वासाची गती म्हणजे श्वासोच्छ्वास घेणे आणि सोडणे त्याकडे लक्ष द्या. या दरम्यान आपण मानसिक हालचाली कडे देखील लक्ष द्या. जसे की एखादा विचार आला आणि गेला, तसाच लगेच दुसरा विचार आला आणि गेला. आपणं फक्त बघा आणि समजा की मी का बरं उगाचच एवढा विचार करत आहोत.
आपण बाहेरून देखील लक्ष देऊ शकता, बाहेरून येणाऱ्या आवाजांकडे लक्ष द्या. त्यामधील एक आवाज असा आहे की जो सतत येत आहे. जसे विमानाची आवाज, पंख्याची आवाज, किंवा जसे कोणी ॐ चे उच्चारण करीत आहे. म्हणजे शांतता.