दर रोज 5 मिनिटे ध्यान करून कोरोनाची भीती घालवा.....

शनिवार, 9 मे 2020 (07:07 IST)
फक्त 5 मिनिटे ध्यान केल्याने आपल्याला चमत्कारिक लाभ दिसून येतील. 

1 ध्यानाचा मूळ अर्थ : 
ध्यानाचा मूळ अर्थ आहे जागरूक राहणे. ध्यान म्हणजे विचारांवर नियंत्रण ठेवणे. ध्यान केल्याने स्मरणशक्ती तसेच एकाग्रता सुद्धा वाढते. त्यामुळे आपणं स्वतःला ताजे तवाने ठेवू शकता. 
 
2 ध्यान का करावे : 
शरीराला निरोगी ठेवण्यासाठी ध्यान करणे आवश्यक आहे. ध्यान केल्याने उच्च रक्तचापाला नियंत्रित करता येतं. शरीरात स्थिरता वाढते आणि ही स्थिरताच शरीरास मजबूत करते. डोकेदुखी कमी होते, मन शांत राहतं. वैचारिक जगातून वर्तमानाकडे लक्ष्य केंद्रित होतं. डॉक्टर सांगतात की भीतीमुळे आपल्या रोग प्रतिकारक क्षमतेवर त्याचा दुष्प्रभाव पडतो. ध्यान केल्याने आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढते. ताण तणाव कमी होते. 
 
3 ध्यान कसे करावे : 
ध्यान करण्यासाठी अंघोळ करून सुखासनात डोळे मिटून आसनावर बसावे. फक्त 5 मिनिटे आपले डोळे बंद करून शरीराची काहीही हाल चाल न करता बसावे. अश्या वेळी आपल्या डोळ्यासमोर येणाऱ्या अंधाराकडे बघत राहावे. आणि श्वासाकडे लक्ष द्यावे. आपल्या मनात असंख्य विचार येतील त्याकडे लक्ष्य न देता फक्त श्वासाच्या गतीकडे लक्ष द्यावे ज्याने मानसिक हालचाली त्वरित थांबतात. आपणास असे वाटू लागते की आपण उगाच अश्या फालतू विचारांमध्ये गुंतत होतो. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती