चेहरा चमकदार बनवायचा आहे, मग व्यायाम करा

गुरूवार, 25 मे 2023 (08:46 IST)
त्वचेवरील चमक कायम राहण्याकरिता ज्याप्रमाणे आपण स्वच्छता व आहाराला महत्त्व देतो त्याप्रमाणे व्यायामही गरजेचा आहे. रोजच्या वेळापत्रकात थोडा बदल करून फक्त दहा मिनिटे हे व्यायाम करून त्वचेची चमक परत मिळवू शकता. 
 
ताठ बसा. डोळे शक्य तितके मोठे करा. आधी घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने व विरोधी दिशेने डोळे फिरवा. डोळे बंद करून पाचपर्यंत आकडे मोजा. हीच क्रिया दहा वेळा करा.
 
तोंड मिटा. नंतर एक दीर्घ श्वास घेऊन तोंड हवा घेऊन फुलवा. आता हवा एका गालात भरून दहापर्यंत आकडे मोजा. दुस-या गालात हवा भरा पाच आकड्यांपर्यंत आराम करा. ही क्रिया दहा वेळा करा.
 
आता गाल आत ओढून घ्या. अगदी दातावर गालाचा दाब पडेपर्यंत गाला आत ओढा.
 
ताठ बसलेल्या स्थितीत दोन्ही ओठ उघडून खळखळून हसा. हसताना गालाच्या पेशींवर प्रभाव पडायला हवा.
 
पुन्हा ओठ बंद ठेवून स्मितहास्य करा, अशी क्रिया दहा वेळा करा.
 
ताठ बसलेल्या स्थितीत चेहरा मागे झुकवा आणि छताकडे पाहा. ओठ बंद करा च्युइंगम चघळल्याप्रमाणे हालचाली करा, यामुळे गळ्याच्या पेशींना व्यायाम होईल.
 
ताठ बसून समोर पाहा आणि डोळे उघडून जोरात ओ म्हणून ओरडा नंतर याचप्रमाणे ई म्हणून ओरडा असे दोन्ही व्यायामाचे प्रकार केल्याने चेह-याच्या पेशींना व्यायाम मिळतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती