पंढरीत दहा लाख भाविक

WD
पर्जन्यराजाने मेहेरनजर केल्याने यंदाच्या आषाढी एकादशी महासोहळला दहा लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले असावेत असा अंदाज आहे. दरम्यान, पालखी सोहळे शहरात दाखल झाल्याने विठूनगरी हरिनामाच्या गजरात दुमदुमून गेली आहे. श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण येथे दाखल झाले आहेत. दरम्यान, विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरच पुढे गेली आहे.

राज्यात दोन वर्षे अवर्षणग्रस्त परिस्थिती होती. ज्याचा परिणाम पंढरीच्या यात्रांवर होत होता. मात्र यंदा जूनपासूनच सर्वदूर पावसाचा जोर असल्याने आषाढी एकादशीचा महासोहळा जास्त संख्येने साजरा होईल असा प्रशासनाचा अंदाज होताच. यातच पालखी सोहळ्यात भाविकांची संख्या लक्षणीय होती. पालखी सोहळ्यातील भाविक पंढरीत दाखल झाल्याने सर्वत्र मोठी गर्दी झाल्याचे चित्र गुरुवारी सायंकाळी दिसत होते. अद्यापही बाहेरून येणारे भाविक एसटी बसेस, रेल्वे- व खासगी वाहनांनी येथे पोहोचत आहेत. प्रशासनाने शहरात वाहनांना प्रवेश न देणचा निर्णय घेतल्याने यात्रा सुरळीत पार पडत आहे. दशमीच्या सांकाळर्पत पंढरीत किमान दहा लाख भाविक दाखल होण्याची शक्यता आहे

वेबदुनिया वर वाचा