शहरात फुलला भक्तिमळा

श्री क्षेत्र शेगावहून पंढरीच्या दर्शनासाठी निघालेल्या गजानन महाराजांच्या पालखीचे आज दि. ९ जुलै रोजी सकाळी सहा वाजता आगमन झाले. यावेळी शहरातील भाविकांनी पालखीचे भव्य स्वागत केले. श्री. च्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.

WD


श्री.क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराजांच्या पालखीचे आज दि. ९ जुलै रोजी सकाळी ८ वा. सुमारास शहरातील एमआयडीसी परिसरात आगमन झाले. यावेळी नगराध्यक्षा सरस्वती घोणे यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. तेरणा महाविद्यालयापासून सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास संत ज्ञानेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने पालखीस वारक-यांना अन्नदान करण्यात आले. यावेळी दोन तास विश्रांतीसाठी पालखी थांबवण्यात आली होती. शहरातील तेरणा कॉलेज, भानु नगर, दत्त नगर, गांधी नगर, संभाजी नगर या भागातील नागरीकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ५०० वारक-यांचा सहभाग असलेल्या गजानन महाराजांच्या दिंडीचे ४० वे वर्षे आहे. ५५० किलोमिटरच्या शिस्तबद्ध प्रवास, टाळक-यांचे पथक, झेंडे घेतलेल्या वारक-यांच्या पथकासमोर दिमाखात चालणारे गजराज या दिंडीचे खास वैशिष्ट्ये आहे.

उस्मानाबादेत आज ही पालखी प्रशासकीय इमारती समोरील मुख्य रस्त्यावरुन शिवाजी चौक, ताजमहल टॉकी, जुन्या शहरातून लेडीज क्लब येथे मुक्कामी थांबली आहे. लेडीज क्लब येथे आज सायंकाळी उशिरापर्यंत भाविक दर्शन घेत होते.

आज पहाटे पालखीचे तुळजापूरकडे प्रस्थान होणार आहे. १५ जून रोजी शेगावहून निघालेली ही पालखी ३३ दिवसाचा प्रवास करुन ५३० कि.मी. अंतर कापून आषाढी एकादशीच्या दिवशी पांडूरंगाच्या पंढरपूरमध्ये पोहचणार आहे. आषाढी एकादशीनंतर १२ ऑगस्ट रोजी ही पालखी शेगावला पोहचणार आहे. त्यानंतर महाप्रसादाने पालखीचा समारोप होणार आहे.

पालखीत असलेल्या वारक-यांच्या सुरक्षेसाठी शेगावच्या संस्थेचे ३० सुरक्षारक्षक या वारीसोबत आहेत. शहरात या पालखीचे विविध सामाजिक संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. ताज महल टॉकी समोर गजानन भजनी मंडळाच्या वतीने वारक-यांना अन्नदान केले तर अनेकांनी फळे व पाण्याच्या बाटल्याने चे ही वाटप केले. गजानन महाराजांची पालखी शहरात दाखल झाल्याने वातावरण भक्तीमय झाले होते.

वेबदुनिया वर वाचा