देशाला स्वातंत्र्य मिळून 67 वर्षे झाली असून आपल्याला मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. राजकीय नेते मात्र जनतेला वेडे बनवत आहेत. त्यामुळे मनसेला एकहाती सत्ता द्या, दुष्काळाला हद्दपार करतो आणि महाराष्ट्राचा विकास करतो, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांनी केले.
दुसरीकडे, राज्याच्या राजकारणात मला राजकीय परिवर्तन घडवायचे असल्याचे राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील पैठण येथील जाहीर सभेत सांगितले. विधानसभा निवडणुकीत मला दुकान चालवण्यासाठी नाही, असे प्रतिपादन राज ठाकरे यांनी केले.
मनसेच्या ब्लू प्रिंटकडे अनेकांनी दूर्लक्ष केले. परंतु ब्लू प्रिंटमधील मुद्दे प्रत्यक्षात उतरवण्यात अपयशी ठरलो ठरलो तर पुन्हा मत मागायला येणार नाही, असेही राज ठाकरे यांनी जाहीर केले. पैठण विधानसभा मतदार संघाचे मनसेचे उमेदवार डॉ.सुनील शिंदे यांच्या प्रचारार्थ राज आले आहेत.