शिवसेनेकडूनच प्रतिसाद नाही, चर्चा कशी करणार- देवेंद्र फडणवीस
गुरूवार, 18 सप्टेंबर 2014 (16:11 IST)
विधानसभा निवडणूक एक महिन्यावर आली आहे. जागावाटपावर भाजपने नेहमी मवाळ भूमिका स्वीकारली आहे. पण शिवसेनेकडूनच कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस गुरुवारी कोल्हापुरात बोलत होते.
शिवसेनेने आपला हट्ट सोडला नाही, तर चर्चा पुढे कशी सरकणार? असा सवालही फडणविसांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. शिवसेनेने प्रतिसाद देऊन चर्चेसाठी पुढे येऊन जागावाटपाचा तिढा लवकरात लवकर सोडवावा, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीला आता महिनाही शिल्लक नसताना महायुतीच्या जागावाटपावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.