महाराष्ट्राने 54 कंपन्यांशी करार केले आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरम्यान 15.70 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी 61 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे, ज्यामुळे 16 लाख रोजगारांची शक्यता निर्माण होऊ शकते.असे राज्य सरकार ने म्हटले आहे.
या वर शिवसेना यूबीटीचे नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारच्या दावोस दौऱ्यावर टोला लगावला आहे. ते म्हणाले, की, दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्र सरकारने ज्या 54 कंपन्यांशी सामंजस्य करार केले आहेत त्यापैकी केवळ 11 कंपन्या विदेशी आहेत तर उर्वरित 43 कंपन्या भारतीय आहेत.
पत्रकारांना संबोधित करताना, आदित्य ठाकरे म्हणाले की, दावोस सहलीवर 20-25 कोटी रुपये खर्च करण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करू शकले असते तसेच राज्य आणि केंद्र सरकारचे प्रमुख आणि सामाजिक उद्योजकांशी बैठका घेऊ शकले असते.
शिवसेनेचे (UBT) आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, "मला खात्री द्यायची आहे की, जागतिक सहकार्यासाठी, विशेषतः महाराष्ट्रासारख्या औद्योगिक आणि प्रगतीशील राज्यासाठी दावोससारखे दुसरे ठिकाण नाही." करारनाम्याबाबत जनसंपर्क उपक्रमातून जनतेची फसवणूक होऊ नये, असेही ते म्हणाले.