वाकोडी येथे कॉँग्रेसच्या प्रचारसभेतील सहा गाड्यांवर दगडफेक करण्यात आली होती. मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे काँगेसचे उमेदवार अरविंद कोलते हे हरीश रावळ, साहेबराव मोरे, सोपान शेलकर काँगेस तालुकाध्यक्ष रमेश खाचणे यांच्यासह पुरुष महिला पदाधिकाऱ्यांसह प्रचारासाठी वाकोडी या गावी गेले होते. प्रचारफेरी सुरू असतानाच वाहनांमध्ये फक्त चालक होते. या वेळी चार ते पाच युवकांनी लाठ्या-काठ्या घेऊन गाड्यांवर हल्ला चढवला. याप्रकरणी सुधीर पाचपांडे यांनी शहर पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवल्यानंतर कालुसिंह राजपूत, अरविंद तायडे, हेम निकम अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.