भाजपने अनेकदा मोठेपणा दाखवला. परंतु शिवसेनेने नेहमीच ताठर भूमिका घेतली. अनेक नवीन प्रस्ताव शिवसेनेकडे पाठवले. युती टिकविण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, प्रत्येक वेळी भाजपनेच मोठेपणा का दाखवायचा' असा सवाल भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला केला आहे.
आतपर्यंत झालेल्या अनेक निवडणुकीत शिवसेनेने 59 जागा कायम गमावल्या, हा मुद्दाच शिवसेनेला अमान्य असून भाजपला अधिक जागा देण्याची सेनेची तयारी दाखवली नाही. भाजपचे प्रभारी ओम माथूर यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची प्रदीर्घ बैठक शुक्रवारी झाली. त्यानंतर खडसे आणि मुनगंटीवार पत्रकारांशी बोलले.