व्हॅलेंटाईन डेची तयारी

प्रेमात प्रत्येक दिवस निराळा असतो. पण व्हॅलेंटाईन डेची बातच काही और. नवीन वर्षाच्या सुरूवातीपासूनच तरुण या प्रीतीदिनाची आतुरतेने वाट बघत असतात. प्रत्येक तरुण या दिवशी काही वेगळे करण्याचा प्रयत्न करत असतो. व्हॅलेंटाइन डे काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. त्यासाठी आजपासूनच तयारीला लागाल. तरच तुमचे सगळे मनसुबे तडीस जाऊ शकतात. नाहीतर वेळेवर पश्चात्ताप करण्या व्यतिरिक्त काहीच शिल्लक राहणार नाही. चला तर मग व्हॅलेंटाईन डेची तयारी करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो.

* सगळ्यात आधी ठरवा की तुम्हाला व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करायचा आहे. तुम्ही आपल्या जोडीदारासोबत एकटेच एकांत स्थळी जाऊ इच्छिता की आपल्या मित्रांसोबत व्हॅलेंटाईन डेचा आनंद लुटू इच्छिता.
* हे ठरविल्यानंतर त्याजागी जाण्यापूर्वी तिथे बुकिंग करावे लागते का? हे बघा. बुकिंगची व्यवस्था असेल तर आधीच बुकींग करून ठेवणे योग्य.
* आता तुम्हाला कसे तयार व्हायचे आहे याचा विचार करा. तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे दिसायचे आहे हे मनाशी पक्के ठरवा. सगळ्यात आधी केशरचनेचा विचार करा. कारण काही वेळेस केसांमुळेच सर्व मेहनतीवर पाणी फिरते. तुमची केशरचना फॅशन नुसार आहे की नाही हे तपासून बघा.
* त्यानंतर कपड्यांचा विचार करा. वेषभूषा कशी करावी हा फार मोठा प्रश्न असतो. ज्या कपड्यांमध्ये तुम्हाला कंफर्टेबलही वाटेल असेच कपडे निवडा. वेळेवर धावपळ करण्यापेक्षा आधीच डिझाइन आणि रंग ठरवून ड्रेस तयार करून घ्या. शक्य असेल तर एक-दोनदा ट्राय करून पहा.
* जास्त भडक मेकअप करू नका. हळुवार संगीतात, प्रकाशात तुम्ही प्रियेला भेटाल तर तुमचा मेकअपही रोमॅंटिकच असायला हवा.
* प्रियेची पसंती लक्षात घेऊनच भेटवस्तू खरेदी करा. भेटवस्तूचे पॅकिंग नवीन पद्धतीचे असेल हे ध्यानात घ्या. पॅकिंग अशी असावी ती भेटवस्तूची आठवण कायस्वरूपी त्याच्या हृदयात कोरली जाईल.
* व्हॅलेंटाईन डेला तुमच्या प्रियेसमोर प्रेम जाहीर करा पण ध्यानात घ्या की प्रत्येक नात्याच्या काही मर्यादा असतात. भावनेच्या आहारी जाऊन असे कोणतेच काम करू नका की नंतर पश्चातापाखेरीज काहीच हाती लागणार नाही.

तुम्हाला काय करायचे आहे हे तर आम्ही सांगितले पण याव्यतिरिक्तही तुमचे काही विचार असतील तर तसे करा. करा तर मग व्हॅलेंटाईन डे साजरा.
बेस्ट ऑफ लक.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती