ऑनलाइन डेटिंग वेबसाईट कोकोलोनी डॉट जेपीने हा सर्व्हे केला आहे. जपानमध्ये महिलांवर पुरुषांप्रमाणेच कामाचा ताण आहे. त्यामुळे काम संपल्यानंतर महिला डेटिंगला जाण्याऐवजी सोफ्यावर झोपून आराम करणं आणि टीव्ही पाहणं पसंत करतात, असं सर्व्हेत म्हटलं आहे.
ऑनलाईन डेटिंग म्हणजे वेळेचा अपव्यय, यामुळे डेटवर न जाणार्या महिलांची संख्या वाढत आहे. कारण डेट करणं हा त्यांना वेळेचा अपव्यय वाटत असल्याचं ऑनलाईन डेटिंग साईट लव्हली मीडियाने म्हटलं आहे. काम, मातृत्व आणि पितृत्व यांमधून वेळ मिळाला तरच महिला प्रेमाच्या बाबतीत विचार करतात, असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून निघाला आहे.