मिळालेल्या माहितीनुसार आपल्या प्रेयसीशी ब्रेकअप झाल्यामुळे एका २४ वर्षीय तरुणाने हत्येचा मार्ग अवलंबला. त्याने सार्वजनिक ठिकाणी तिच्यावर अनेक वेळा चाकूने वार केले. त्यानंतर त्याने तिच्यावर हल्ला केल्यानंतर आत्महत्या केली. रस्त्याच्या मधोमध घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी लालबागच्या चिंचपोकळी परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोनू बरई याचा मृत्यू झाला, तर २४ वर्षीय मनीषा यादव ही एका खाजगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल आहे.