'हग डे'च्या दिवशी लोक एकमेकांना प्रेमळ मिठी (जादूची झप्पी) मारून, आपल्या भावना व्यक्त करतात. ज्यांच्याबद्दल प्रेम आहे त्यांना या दिवसाच्या शुभेच्छा देतात. एखाद्यास मिठी मारल्याने आपण त्याच्यासोबत आहोत हे भावना जागृत होते. तसेच एखाद्याचे एकटेपण दूर होण्यासही मदत होऊ शकते. पण विचार करायला गेलं तर हे खरं असेल का हा प्रश्न अनेक लोकांचा मनात येत असेल म्हणून जाणून घ्या की किती फायदेशीर आहे जादूची झप्पी.
याने चेहर्यावर ग्लो देखील येतो.
हग केल्याने ऑक्सीटोसिन लेवल बूस्ट होतं ज्याने एकाकीपणा, काळजी आणि या प्रकाराच्या अनेक समस्या सुटतात.
गळाभेट दिल्याने कोर्टिसोल लेवल कमी होतं आणि मेंदूला शांती मिळते ज्याने ताण कमी होतं.
भीती वाटत असलेल्या लोकांना झप्पी देण्याने त्याची भीती दूर होते.
याने मेटाबोलिज्म वाढतं.
झप्पीमुळे झोप देखील पूर्ण होते.
एकूण झप्पी दिल्यामुळे जीवनात येत असलेल्या समस्यांना तोंड देताना आपल्या मदतीसाठी किंवा इमोशनली आपल्या जवळ असल्याची जाणीव निर्माण होते आणि यामुळे मनुष्य मानसिक रूपाने मजबूत होतो आणि मेंटल स्ट्राँगनेसमुळे जीवनातील प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याचे बळ मिळते.