उत्तराखंडमध्ये मतदानात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त

गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (15:41 IST)
उत्तराखंड विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून 14 फेब्रुवारी रोजी राज्यभरातील सर्व जागांसाठी मतदान पूर्ण झाले. या निवडणुकीत एकूण 65.37 टक्के लोकांनी मतदान केल्याचे समजते. तर यावेळी झालेल्या निवडणुकीत महिलांनी पुरुषांना मागे टाकले. आपले प्रतिनिधी निवडण्यासाठी पुरुषांपेक्षा महिलांनी मतदानात अधिक सक्रिय सहभाग घेतल्याचे कळून आले आहे.
 
उत्तराखंडच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या मते- 14 फेब्रुवारी रोजी राज्यभरात एकूण 65.37 टक्के मतदान झाले. यात 62.60 टक्के पुरुषांनी मतदान केले. महिला मोठ्या संख्येने बाहेर आल्या आणि 67.20 टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुषांपेक्षा 4.60 टक्के अधिक महिलांनी मतदान केले. मात्र, 2017 च्या तुलनेत यावेळी मतदान कमी झाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती