उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या 2022 चा सातवा टप्पा संपल्यानंतर संध्याकाळी एक्झिट पोल येणे सुरू होईल. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरसह पाच राज्यांमध्ये मतदान झाल्यानंतर 10 मार्चला निकाल लागण्याची सर्वांना प्रतीक्षा आहे.
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? यासंदर्भात एक्झिट पोलचे निकाल आज संध्याकाळी 6 नंतर येण्यास सुरुवात होईल.
10 फेब्रुवारीपासून यूपीमध्ये सात टप्प्यात मतदान पार पडले आहे. मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारीपासून दोन टप्प्यात, तर उत्तराखंड आणि गोव्यात 14 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान झाले. पंजाबमध्येही 20 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान झाले. सर्व विधानसभा निवडणुकांचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहेत.