सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व लोकांसाठी त्यांचे आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे खूप महत्वाचे आहे. तसे न केल्यास पॅन कार्ड रद्द होऊ शकते. त्यामुळे अनेक लोक वेळेत आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करत आहेत, परंतु काही लोक असे आहेत की ज्यांनी हे काम आजतायगत केले नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात, ज्यामुळे त्यांनी अद्याप त्यांचे आधार आणि पॅन कार्ड लिंक केलेले नाही, परंतु एक सर्वात मोठे कारण म्हणजे लोकांच्या आधार आणि पॅन कार्ड दोन्हीमध्ये जन्मतारीख वेगळी आहे. त्यामुळे आधार आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक केले जात नाहीत. जर आपल्यासह ही असे घडले असेल, तर आता घाबरण्याची गरज नाही, कारण या समस्येला अगदी सहजपणे सामोरे जाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया. काय करावे ते.
जन्मतारीख वेगळी असल्यास लिंक कसे कराल ?
* जर आपली जन्मतारीख दोन्ही ठिकाणी म्हणजेच आधार आणि पॅन कार्डमध्ये वेगवेगळी असेल, तर त्यासाठी आपल्याला ती आधी दुरुस्त करावी लागेल.