देशात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. यासाठी 1 जानेवारीपासून नोंदणी करता येणार आहे. CoWIN प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ आरएस शर्मा म्हणाले की, यासाठी आपण Cowin अॅपवर नोंदणी करू शकाल.
लस नोंदणी प्रक्रिया जाणून घ्या .
1 सर्व प्रथम Cowin App वर जा. मोबाईल क्रमांक टाका. ओटीपी येईल आणि तो टाकून लॉग इन करा.
2 आता आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड, व्होटर आयडी, युनिक डिसॅबिलिटी आयडी किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक फोटो आयडी पुरावा निवडा.
3 आपण निवडलेल्या आयडीचा नंबर, नाव टाका. त्यानंतर लिंग आणि जन्मतारीख निवडा.
4 सदस्य जोडल्यानंतर, आपण आपल्या जवळच्या क्षेत्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्रांची यादी येईल.
5 आता लसीकरणाची तारीख, वेळ आणि लस निवडा. केंद्रावर जाऊन लसीकरण करा.
6 लसीकरण केंद्रावर, तुम्हाला रिफ्रेन्स आयडी आणि सिक्रेट कोड सांगावा लागेल. जे आपण नोंदणी केल्यावर मिळतो.